अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : बोडखा – दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूक निकालामध्ये बोडखा (चिंचखेड) येथील विकास सुभाष वानखडे या युवकाला ग्रामस्थांनी जनतेमधून निवडून दिले आहे. 26 वर्षीय विकास वानखडे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सतत कार्य करून गोरगरिबांच्या समस्यावर धावून आले आहे. बोडखा येथील गट ग्रामपंचायत असून,या ग्रामपंचायतीवर सर्वाधिक मतांनी आपले वर्चस्व स्थापन केले आहे.ते या तालुक्यातील सर्वात युवा तरुण नवनिर्वाचित सरपंच ठरले आहे.


