चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये. वंचित बहुजन आघाडी अकोट शहराच्या वतीने माननीय रेल्वे प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे मंडळाला विनंती करण्यात आली की, अकोट शहरामध्ये एक ते दीड लाख लोकसंख्या असून तालुका शंभर ते सव्वाशे खेडी जोडले गेली आहेत अकोला हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे दररोज लोकांना येणे जाणे करावे लागते, यामध्ये व्यापारी वर्ग शेतकरी विद्यार्थी शासकीय सेवेत असणारे कर्मचारी जिल्ह्याच्या बाहेरून येणारे पाहुणे मंडळी रुग्णसेवा अतितात्कालीन रुग्णांना लागणारी सेवा, जी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करते, जिल्ह्याचे शासकीय तथा निमशासकीय कार्यालय अशा प्रकारचे अनेक ठिकाणी आहेत,शहरातील तसेच ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांना अकोला ते अकोट दररोज वर्दळ करावी लागते, अशातच रेल्वे प्रशासनाने केवळ दोन रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत, रेल्वे प्रशासनाची ही सेवा नागरिकांना अपुरी पडत आहे, करिता दररोज अकोट ते अकोला करिता चार फेऱ्या तसेच अकोला वरून अकोट करिता चार फेऱ्या सुरू करण्यात यावे. स्टेशन तसेच परिसर सुसज्ज करण्यात यावे यामध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दररोज परिसरातील स्टेशनची साफसफाई, रेल्वे कॅन्टीन तसेच निवासी स्टाफ , महिलांच्या सुरक्षतेसाठी कुठल्याही प्रकारची लापरवाही होऊ नये म्हणून आरपीएफ पोलीस चौकी, यामुळे स्टेशन परिसरातील सुरक्षा व सुव्यवस्था अभाधित होणार नाही . रेल्वे प्रशासनाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोट ते अकोला अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे, यावर रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अकोट ते अकोला अतिरिक्त रेल्वेगाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात येतील. सदरची निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपकभाऊ बोडखे , यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीता ताई आढाऊ, उपाध्यक्ष सुनील पाटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा महासचिव शोभा शेळके, जि प सदस्य पुष्पा इंगळे, गजानन गवई विशाल आग्रे, दिनेश घोडेस्वार, जम्मू पटेल अक्षय तेलगोटे मुरली तेलगोटे तसलीम मिर्झा, देवानंद तायडे श्रीकृष्ण देवकुंदी शंकर राजुस्कर शीलवंत शिरसाट, विकी इंगळे राहुल शिरसाठ संजय वानखडे विकी वानखडे आदि सह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.