अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : अकोला होमगार्ड जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांच्या आदेशावरून प्रशासकीय अधिकारी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंद्र नायक शेळके, जयस्वाल यांच्या नेतृत्वात पातूर तालुका होमगार्ड समादेशक संगीता इंगळे यांच्या उपस्थितीत 11 डीसेंबर रोजी पातुर पोलीस स्टेशन येथे 76 वा होमगार्ड वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन पातुर तालुका होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पातुर वनविभाग परिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, ॲंडो. महेंद्र मृग,प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्व विद्यालयाच्या संचालिका श्रीमती लीनादिदी,उपसंचालीका प्रभा दीदी,प्रा. अतुलजी विखे सर,डॉ. सुनील,आवटे,जेष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे, पत्रकार किरण कुमार निमकंडे, प्रमुख पाहुणे मंचकावर उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन सोहळा सप्ताह 7 डिसेंबर ते 13 डीसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो.11 डीसेंबर रोजी पातुर येथे उत्साहात साजरा करण्यात आला़.होमगार्ड संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाची प्रभात फेरी काढून सुरुवात करण्यात आली.होमगार्ड चिरायू होवो, वंदे मातरम,भारत माता की जय, हम सब एक है, अशा जल्लोषात पातुर तालुक्याच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.होमगार्ड सैनिकांनी कोरोना काळात कर्तव्य करून शासनाला मोलाचे सहकार्य केले.कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक उत्सव बंदोबस्त होमगार्ड फार चांगल्या जबाबदारीने कर्तव्य बजावतात. होमगार्डच्या कार्याची प्रशंशा करत सर्व मान्यवरांनी होमगार्ड सेवा ही पोलिसांचे सच्चे साथीदार असल्याचे ठाणेदार हरिश गवळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणातून होमगार्ड सैनिकांच्या कर्तव्याचे कौतुकास्पद अभिनंदन केले. यावेळी होमगार्ड तालुका समादेशक संगीता इंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता इंगळे यांनी केले.तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला होमगार्ड रवीना अंभोरे सह निलेश नाकट यांनी केले.वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्याम शेगोकार सार्जंट,कैलास सावंत,विठ्ठल ढगे,दत्ता नरेंद्र गवी ,निलेश परमाळे,अमोल पोहरे, गजानन घेघाटे ,अक्षय क्षीरसागर ,शेख अख्तर,प्रकाश चव्हाण,दुतोंडे बुरुडे, कराळे, आसिफ खान, चेतन, शंकर, अक्षय क्षिरसागर,भगत, उमेश,वैभव गाडगे, मो.तालेब अक्षय सदार, शारदा,माधुरी, सुनीता विनीता, श्रद्धा यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच पातुर पथकातील महिला पुरुष होमगार्ड यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.