अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी संघाचा 14 वर्षे वयोगटातील कबड्डीस्पर्धेमध्ये विजय झाला. जिल्हा स्तरावर वसंतराव नाईक विद्यालयाच्या कबड्डी संघाची जागेश्वर विद्यालय वाडेगाव या कबड्डी संघा बरोबर अंतिम लढत झाली होती.या लढतीत वसंतराव नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागेश्वर विद्यालय वाडेगाव या कबड्डी संघाचा पराभव करून दणदणीत विजय प्राप्त केला.या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी झाल्यानंतर वसंतराव नाईक विद्यालयाच्या कबड्डी संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.क्रीडा स्पर्धेतील वसंतराव नाईक विद्यालयाच्या संघाने आकर्षक कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक / सचिव रामसिंग जाधव तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस.एम. सौंदळे यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.कबड्डी स्पर्धेमध्ये विजयी खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शक शिक्षक चंद्रकांत वाघ, वसंत राठोड,पातुर तालुक्याचे क्रीडा संयोजक प्रा.सुरेश लुंगे तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल लोथे यांचे मार्गदर्शन लाभले. वसंतराव नाईक विद्यालयाच्या कबड्डी संघाचे विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.