चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट – स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथे गृहअर्थशास्त्र विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री संजय आठवले उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना, प्रा. डॉ. विलास तायडे सचिव माजी विद्यार्थी संघटना उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीमती आरती हिरुळकर, विभाग प्रमुख, हस्तकला विभाग , विद्यांचल स्कूल, अकोट तसेच कु. दिपाली अघम यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त आणि कलागुणांचा विकास व्हावा या दृष्टीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कृत्रिम फुले, पुष्पगुच्छ , हार , तसेच विविध प्रकारच्या वस्तू कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण देण्यात आले. रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास या दृष्टीने सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी प्राचार्य सुनील पांडे, श्री संजय आठवले, डॉ. विलास तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . साक्षी ठाकूर यांनी केले प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ . स्वाती वैद्य यांनी केले सर्व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा . नहाटे यांनी केले . या कार्यशाळेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. डॉ. स्वाती वैद्य, प्रा. कु.फोकमारे, प्रा.नहाटे यांनी परिश्रम घेतले . यावेळी ८० विद्यार्थीनींनी उत्स्फुर्त घेतला .