चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
कुटासा : स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व क. म. वि.मधील विद्यार्थ्यांनी विद्यालयाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय स्तरावर आपले नाव नोंदविले.पैकी वर्ग १२ मधील आदर्श गावंडे याने गोळा फेक मध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला तसेच वर्ग १२वी मधीलच विद्यार्थी प्रज्वल गावंडे याने ४००मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे क. म. वि. चे प्रभारी प्राचार्य.श्री. संतोषराव चरपे यांनी कौतुक व अभिनंदन केले.तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्रभारी प्राचार्य.श्री. संतोषराव चरपे व क्रीडा शिक्षक श्री. निलेश ठाकरे यांना देत त्यांचे आभार मानले असे प्रसिद्धी प्रमुख श्री.जी. आर. तळोकार कळवतात.