पिंपरी : अडीच कोटी रुपये किंमत असलेली जमीन 50 लाख रुपयांमध्ये बळकावण्याचा प्रयत्न करणार्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मस्केवस्ती, रावेत येथे घडला. दत्तात्रय रामचंद्र पवळे (रा. पवळे सदन, निगडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. यासह राजू गोपाळ मस्के (रा. मस्केवस्ती, रावेत), नितीन छगनलाल जैन (रा. नेहरूनगर, पिंपरी), राहुल किरणराज चोपडा (रा. प्राधिकरण, निगडी), कपिल बसंतीलाल चोपडा (रा. प्राधिकरण, निगडी) गोकुळ भीमा मस्के (50, म्हस्केवस्ती, रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब व्यंकटराव गायकवाड (48, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेतला. तसेच, फिर्यादी यांच्या जागेची किंमत अडीच कोटी असताना ती जमीन 50 लाख रुपयांच्या खंडणीमध्ये बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पन्हाळे करीत आहेत.


