अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी,शाखा पातूर येथे दि. 06 डिसेंबर 2022 रोजी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तीक्ष्णगत संस्था कार्यालय येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती पातूर पो. स्टे. उपनिरीक्षक मा.हर्षल रत्नपारखी,आनंद वानखडे राष्ट्रवादी काँग्रेस महासचिव अकोला जिल्हा,तीक्ष्णगत सदस्य अमित खांडेकर, पोलीस कर्मचारी वसंता राठोड,विशाल शिंदे, श्वेता शिरसाट,चाइल्ड लाईन सदस्य उमेश शिरसाट, पातूर शाखा समन्वयक आशिष दाभाडे, युवा पत्रकार अविनाश पोहरे, नारायण वाडी,पंकज पोहरे, त्र्यंबक इंगळे आदी उपस्थित होते.


