अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पातूर पंचायत समिती कार्यालय मध्ये पं.स. सभापती सौ.सुनीता टप्पे, उपसभापती इमरान खान, गट विकास अधिकारी रुद्रकार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नागेश करवते, राजेश इंगळे,विलास टप्पे, सचिन घुबडकार,पुंडलिक कावळे,अक्षय भारसाकळे, संतोष इंगळे,राहुल सुरवाडे,पंजाब राठोड, संतोष तिवाले, नितीन हिवराळे, सुधीर देशमुख,सुधाकर कांबळे,आदी कर्मचारी वर्ग तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.


