अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : मा.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख अरविंद सावंत, प्रकाश शिरोळकर, मा.जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख तसेच जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व शिवसेना तालुका प्रमुख रवि मुर्तडकर यांच्या आदेशाने अनिल निमकंडे यांची पातुर तालुका शिवसेना निवासी उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अनिल निमकंडे यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख गजानन शिंदे,युवा सेना तालुका प्रमुख सागर रामेकर, माजी नगरसेवक परसराम उंबरकर यांची उपस्थिती होती.