अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शिर्ला आज दि.06 डिसेंबर 2022 रोजी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिर्ला ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हरार्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिर्ला ग्रामपंचायत सरपंच सौ.अर्चनाताई शिंदे, ग्रा.पं सदस्य फिरोज खान, मंगल डोगंरे मनोहर पातुरे,सौ. सुरेखाताई वसतकार,जेष्ठ सदस्या श्रीमती रेखाताई गवई, जेष्ठ नागरिक नारायण अंधारे व विरपिता काशिराम निमकंडे, सुधाकर शिंदे,अंनतराव अंधारे तसेच कर्मचाऱी हेमंत घुगे, प्रमोद उगले, संजय खरडे,अंबादास इंगळे, आवेज खतीब तसेच गावातील गावकरी मंडळी व नागरीक आदी उपस्थित राहून महामानवास अभिवादन करण्यात आले.