यवतमाळ : शेतात पाणी दिल्यानंतर झाडाखाली खाटावर झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील काळीदौलत खान शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने महागाव आणि पुसद तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन वसंता राऊत (४९) रा. काळीदौ. असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात पिकांची राखण करण्यासाठी जागलीला गेले होते. ते शेतातच चिंचेच्या झाडाखाली असलेल्या खाटावर झोपी गेले. गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात बबन राऊत यांचा मृत्यू झाला. मात्र, रात्र असल्याने ही घटना कुणालाच कळली नाही. सोमवारी सकाळी बबन यांची पत्नी नेहमी प्रमाणे पती परत आले नाही, म्हणून शेतात पाहण्यासाठी गेली. त्यावेळी बबन राऊत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पत्नी शेतात जाण्यापूर्वी बबन राऊत यांच्या मुलाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोमवारी सकाळी ही घटनेची माहिती ग्रामस्थांनी पुसद ग्रामीण पोलिसांना दिली. बबन राऊत यांची हत्या कुणी व का आहे. घटनेनंतर मृताचा सख्खा लहान भाऊ फरार झाल्याने या संशय व्यक्त केला जात आहे. मृत बबन राऊत यांचा मुलगा मनीष याने पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.