नाशिक : नाशिकमधुन निर्यात मोठ्याप्रमाणात वाढावी आणि अधिक परकीय चलन मिळावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयमाच्या पुढाकाराने निर्यात व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 25 प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या बॅचसह त्याचा शुभारंभ करण्यात आला हाेता, केवळ तीन आठवड्यातच दुसऱ्या बॅचला देखिल रविवारी सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या बॅचच्या प्रवेशासाठी 50 अर्ज आले होते त्यापैकी 25 जणांना प्रवेश देण्यात आला यावरून उद्याेजकांचा या अभ्यासक्रमाकडे वाढता कल दिसून येताे आहे. नाशिकच्या निर्यातदारांना निर्यात विषयक सखोल ज्ञान व्हावे यासाठी त्यांच्या हिताच्यादृष्टीने आयमाच्या पुढाकाराने अभ्यासक्रम सुरू व्हावा अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर सिम्बॉयसिसबरोबर चर्चा करून अभ्यासक्रम निश्चित झाला आणि त्याच्या पहिल्या बॅचला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आता दुसऱ्या बॅचचा शुभारंभ करतांना आमचा आनंद अधिक द्विगुणित झाल्याचेही पांचाळ यांनी निदर्शनास आणले.
दुसऱ्या बॅचला प्रवेशासाठी 50 अर्ज आले होते. त्यापैकी 25 जणांना प्रवेश देण्यात आला असून एप्रिल 2023 मध्ये तिसऱ्या बॅचचा शुभारंभ करण्यात येईल असे आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यावेळी म्हणाले, यावेळी सिम्बॉयसिस प्रा. डॉ. पी.रत्ना, मनीषा बोरसे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या. आयमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, निर्यात समितीचे चेअरमन हर्षद ब्राह्मणकर, सिद्धेश रायकर, रवींद्र महादेवकर, दिलीप वाघ यांच्यासह दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.