पुणे : पुण्यातील एका साेसायटीत एका 66 वर्षीय स्विमिंपूलमधील जिम केअर टेकरने 12 आणि 15 वर्षाच्या दाेन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुदिप्ताे शामचरण चक्रवर्ती (वय- 66, रा. पुणे) या आराेपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी साेमवारी दिली. याबाबत पीडित मुलीच्या 42 वर्षीय आईने चंदननगर पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना एक वर्षापूर्वी तसेच ऑगस्ट 2022 आणि ऑक्टाेबर 2022 मध्ये घडलेली आहे. तक्रारदार महिला राहत असलेल्या साेसायटीचे स्विमींगपूल व जिम केअर टेकरची जबाबदारी सुदिप्ताे चक्रवर्ती यांचेकडे आहे.
तक्रारदार महिला यांची 12 वर्षीय मुलगी साेसायटीच्या ओपनजीममध्ये असताना आराेपीने तिला मिठी मारून विनयभंग केल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदार यांची दुसरी 15 वर्षीय मुलगी ही जीममध्ये असताना याेगाची स्टेप कर त्यामुळे लैंगिक क्षमता वाढते, असे म्हणून स्विमिंगचे ओळखपत्र बनविण्यास गेली असता तिच्या हातास धरुन आराेपीने विनयभंग केला. संबंधित घडलेला प्रकार पीडित मुलींनी कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पालकांच्या तक्रारीनुसार, याप्रकरणी केअर टेकरविराेधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर त्याला अटकही झाली. पुण्यात सार्वजनिक रस्त्यावर फुगे विक्री करणारी एक महिला तिच्या तीन मुलींसाेबत कल्याणीनगर परिसरात एका बंद पडलेल्या बांधकामाचे बेसमेंट मध्ये 26 नाेव्हेंबर राेजी रात्री झाेपलेली हाेती. त्यावेळी आरोपीने पाच वर्षाच्या मुलीला घेऊन तिची विनयंभग केला. याप्रकरणी राम टेकबहादुर (वय-35,रा.वडगावशेरी,पुणे) या आराेपीस येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने आराेपी विराेधात पाेलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे.