पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. शेकोटी पेटवण्याचा वादातून 6 जणांच्या अल्ववयीन टोळींनी एका 35 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. तसेच ही घटना खडकीतील सुरती मोहल्ला याठिकाणी घडली हाेती. आशिष रमेश कांबळे (वय 35, ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच सहा अल्पवयीनांनी बेसावध तरुणावर हल्ला करून खून केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले हाेते. याप्रकरणी 14 वर्षाच्या दोन आणि 17 वर्षाच्या दाेन अशा एकूण चार अल्पवयीन आराेपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी साेमवारी दिली आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण गायकवाड (वय 48) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषने काही दिवसांपुर्वी पानटपरी व्यवसाय सुरू केला होता. दोन ते तीन दिवसांपुर्वी हल्लेखोरापैकी काहीजणांचा आशिषसोबत वाद झाला होता. त्याच वादातून टोळक्याच्या मनात राग होता. शनिवारी रात्री साडे बाराच्या सुमारास आशिष सार्वजनिक शौच्छालयात गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या सहा अल्पवयीनांसह साथीदारांनी अचानक आशिषवर पालघन, कोयत्याने वार केला तसेच दगड व सिमेंटच्या ब्लाॅकने मारले. डोक्यात जोरात घाव घातल्याने आशिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्या खूनानंतर टोळके घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्यांसह खडकी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. तक्रारदार यांचा मामे भाऊ असलेला मयत अशिष कांबळे याचे खुनासाठी काेणीतरी चिथावणी दिली असल्याचा संशय असून पोलिसांनी सदर हल्ल्यातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. याबाबत पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे करत आहे.
डोक्यात जोरात घाव घातल्याने आशिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्या खूनानंतर टोळके घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्यांसह खडकी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. तक्रारदार यांचा मामे भाऊ असलेला मयत अशिष कांबळे याचे खुनासाठी काेणीतरी चिथावणी दिली असल्याचा संशय असून पोलिसांनी सदर हल्ल्यातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. याबाबत पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे करत आहे.


