नाशिक : नाशिकमध्ये अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली. पंचवटीतील रामकुंड व परिसरात अतिक्रमण आज (दि. 25) हटवण्यात आले आहेत. पंचवटी-रामकुंड,रामघाट भागात नाशिक मनपाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज रोजी सकाळी अचानक भेट दिली. यावेळी आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांना रामकुंड पार्कींग व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असल्याचे दिसून आले. आयुक्त डॉ. पुलकुंडवार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर संतापले. आणि काही तासात आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार उपायुक्त करूणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांनी तातडीने पंचवटीतील रामघाट-रामकुंड भागात विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या अतिक्रमण हटाव मोहीम प्रसंगी रामकुंड-रामघाट भागातील लहान-मोठया व्यवसायदार यांचे अतिक्रमण अतिक्रमण काढण्यात आले.
दरम्यान,पंचवटी-रामकुंड भागातील पार्किंग ठिकाणी सध्या स्मार्ट सिटीकडून सुशोभीकरण अंतर्गत विविध कामे सुरू आहेत.सदर प्रसंगी कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये. व येथे येणारे भाविकांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून परिसरात अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रामकुंड व संपूर्ण रामघाट भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रारंभी आज (दि.२५) रोजी सकाळी मनपा आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रामघाट-रामकुंडसह परिसरात पाहणी केली. यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी रामकुंड पार्कींग व परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्याचे सुचना दिल्यात. त्यानुसार उपायुक्त करूणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांनी अतिक्रमण विभागाकडून रामघाट-रामकुंड पार्कींग येथील मोठ्या प्रमाणात असलेले अतिक्रमण तात्काळ हटवून रामकुंड पार्कींग व परिसर मोकळा व अतिक्रमण मुक्त करण्यात आला.तसेच रामघाट व रामकुंड पार्कींग परिसरातील लहान-मोठ्या व्यवसायिक यांनी पुन्हा अतिक्रमण करू नये.नाहीतर कठोर कारवाई करण्यात येईल.यांसह इतर आवश्यक सुचना देण्यात आले.या प्रसंगी पंचवटी विभाग प्रशासकीय अधिक्षक मंगेश वाघ,सहा.अधिक्षक भुषण देशमुख,अतिक्रमण प्रभारी प्रमुख प्रविण बागुल,राष्ट्रीय फेरीवाला झोनचे प्रकाश उखाडे,निलेश वाबळे,दिपक मिंधे,राजेश सोनवणे,नंदू खांडरे,राजेश साळुंखे,नरेश औटे आदी उपस्थित होते.











