महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : दररोज पायदळ शाळेत जाणा-या विद्यार्थीनींना मदतीचा हात म्हणून तिरवंजा(मोकासा) ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत कोपुला यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथील महिला मंडळांतर्फे नुकतेच सायकलींचे वितरण करण्यात आले.
ग्रामपंचायत तिरवंजा (मोकासा) चे उपसरपंच प्रशांत कोपुला यांच्या विशेष आग्रहास्तव व विनंती वरून चंद्रपूर येथील झंकार महिला मंडळ व मयुरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटाच्या सामाजिक कार्यामधून मौजा तिरवंजा (मोकासा) येथील श्री. गजानन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कवठी या शाळेत ६ कि.मी. दररोज पायदळ जाणाऱ्या तिरवंजा येथील वर्ग ८ वी ते १२ वी च्या १२ गरजू शाळकरी मुलींना सायकल चे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी सायकलींचे वितरण मंडळाच्या पदाधिकारी अनिता अग्रवाल, इंदू सिंग, रीना कुमार, श्रद्धा श्रीवास्तव, आभा द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यीनी व ग्रामपंचायत तिरवंजाच्या वतीने दोन्ही महिला मंडळाचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत तिरवंजा तर्फे उपसरपंच प्रशांत कोपुला व ग्रामपंचायत कर्मचारी शालिक मेश्राम व अभिषेक पाटील उपस्थित होते.