अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
पातूर : रविवार दि : 16 ऑक्टोबर रोजी पातुर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाचे निवडणूक पंचायत समितीच्या बचत भवन पार पडली. यामध्ये ईश्वर चिठ्ठ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून निघाल्या असल्याने पातुर शहरात जल्लोष करण्यात आला. यावेळी पातुर पं. स. येथे सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होती. यामध्ये शिवसेनेकडून सभापती पदासाठी पंचायत समिती सदस्य सौ मनीषा अजय ढोणे व वंचित कडून सुनीता अर्जुन टप्पे यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते तर उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून गोपाल ढोरे, वंचित आघाडी कडून इमरान खान मुमताज खान यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते.यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सुनीता अर्जुन टप्पे यांची सभापती पदी तर उपसभापती पदी इम्रान खान मुमताज खान यांची ईश्वर चिट्ठीने निवड झाल्याने सभापती व उपसभापती निवडून आले.यावेळी पातुर तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार विजय खेडकर,गटविकास अधिकारी डॉ.उल्हास मोकळकर आदींनी काम पाहिले.तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ,मंगेश गोळे,दिनेश गवई, माजी तालुकाध्यक्ष किरण सरदार, राजेंद्र इंगळे, मंगला इंगळे,चंद्रकांत तायडे,हरिभाऊ इंगोले,चरणसिंग चव्हाण,राजू बोरकर,नितीन हिवराळे, शैलेंद्र गुडदे इत्यादीसह पातूर तालुक्यातील वंचितचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना हार व पुष्पगुछ देऊन शुभेच्छा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, मनोहर बेलोकर, मनोज गवई, धम्मदीप इंगळे इत्यादी उपस्थित होते.