साईनाथ दुर्गम
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भगवंतराव हायस्कुल टेकडा ताला येथे वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आले आहे. भगवंतराव हायस्कुल टेकडा ताला चे मुख्यध्यापक जे. ए. सरकार यांनी दिवंगत डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या दिप प्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पन केले. तसेच शिक्षक व विद्याथ्यानी पुल अर्पन करूण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले आहे शाळेचे मुख्यध्यापक जे ए सरकार दिवंगत डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन का म्हणतात? याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थानी डाॅ. कलाम यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रामाचे अध्यक्ष जे ए सरकार , शिक्षक दामोदर राऊत , एम. के. आरवेली , डी. एच. हालदार, बी. एन. मुंजदार , एस. एस. मंंडल, आर आर मेननी , पि. पी. कासेट्टी , प्रा. एम. एल. डोंगरे , वार्ताहर रवि बारसागंडी व कर्मचारी अशोक यांनी अथक प्रयत्न केले. सुञसंचालन कावेरी दुर्गम तर आभार सुरज रामटेके यांनी केले