अकाेला : पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदासाठी रविवारी विशेष सभा हाेणार आहे. जिल्ह्यातील सात पैकी चार पंचायत समितींवर वंचित बहुजन आघाडीचे सभापती आहेत. पाच पंचायत समितींच्या सभापती पदासाठी महिला आरक्षण निश्चित झाले असून, यात तेल्हारा, अकोला, पातूर, बार्शीटाकळी, अकोट पंचायत समितीचा समावेश आहे. राजकीय पक्षांनी ‘फिल्डींग’ लावली असून, इच्छुकांची धाकधूक वाढली. पंचायत समिती सभापती पदासाठी लागू असलेला आरक्षण कालावधी संपल्यानंतर लगतच्या दिवसांपासून उर्वरित अडीच वर्ष कालावधीसाठी आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली. त्यानंतर सभापती, उपसभापदी पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घाेषित झाला असून, रविवारी विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया हाेणार आहे.
आज हाेणार चित्र स्पष्ट २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तेल्हारा, अकाेट, बाळापूर, अकाेला या पंचायत समित्यांवर वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला हाेता. अकाेला पं.स.च्या २० पैकी ११, अकाेटच्या १६ पैकी ७, तेल्हारा १६ पैकी ११, बाळापूर १६ पैकी ९ जागांवर ‘वंचित’चे सदस्य विजयी झाले हाेते. त्यामुळे सभापती पदाची चिवडणूक त्यांनी सहज जिंकली हाेती. पातूरची जागा शिवसेनेचे काबीज केली हाेती. दरम्यान आता रविवारी हाेणाऱ्या निवडणुकीनंतर पुढील अडीच वर्षासाठीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.