अकाेला : दाेन वर्षांनी गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक व माेठ्या प्रमाणात धम्म मेळावा हाेणार असून, तीन लाखांवर अनुयायी सहभागी हाेतील, असा आशावाद आयाेजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. साेहळा भारतीय बाैद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीतर्फे हाेणार आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गत दाेन वर्षे जाहीर उत्सवांवर मर्यादा हाेत्या. मात्र यंदा निर्बंध हटवण्यात आले दरवर्षी विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी ६ ऑक्टाेबरला धम्मचक्र दिन प्रवर्तन दिन साेहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक दुपारी निघाणार आहे. हा कार्यक्रम भारतीय बाैद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीसह आघाडीची महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक िवद्यार्थी आंदाेलन, विद्वत सभसेह अन्य शाखांतर्फे साेहळा हाेणार आहे. या मेळाव्याला प्रामुख्याने धम्म मेळाव्यात अॅड. प्रकाश आंबेडकर व पू. भंते बी संघपाल महाथेराे प्रामुख्याने संबाेधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बाैद्ध महासभेचे अध्यक्ष पी.जे. वानखडे हे राहणार आहेत.