कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : शहरातील आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून संपूर्ण बाजारामध्ये चिखल व साचंलेले पाणी पायाने तुडवीत लोक बाजारात करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात रोगराईचे थैमान पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अकोट नगर परिषद विषयी नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. व अकोट शहराच्या विकास कामाबद्दल प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसत आहेत. अकोट शहराला लागूनच 70 ते 80 खेडी जोडल्या गेले आहेत. यामध्ये नगरपरिषद अकोट शहराची उदानसिता निर्माण झाली आहे .व अशा परिस्थितीतील लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळ मांडला चे चित्र दिसून येत आहेत.येत्या आठ ते दहा दिवसात आठवडी बाजाराची पर्यायी व्यवस्था न झाल्यास. आठवडी बाजार हा नगरपरिषद मध्ये भरण्यात येईल. अन्यथा वंचित च्या वतीने तीव्र आंदोलन छळण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.या वेळी उपस्थित दीपक बोडखे.काशीराम साबळे, मुरलीधर तेलगोटे,विशाल आग्रे,दिनेश घोडेवार,नितीन वाघ, नरसिंग जाधव,अमर भोपीर,सुभाष तेलगोटे,भूषण सुर्निया,सुभाष वानखडे,रोशन कोमलकर,अक्षय तेलगोटे,दीपक तेलगोटे,भीमराव डोंगरदिवे,सुरेंद्र तेलगोटे,नितीन वानखडे,रितिक किल्लेकर व सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.











