अविनाश पोहरे
ब्युरो, अकोला
पातूर : बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पातुर तहसील कार्यालया मार्फत निवेदन सादर करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनात असे म्हटले की तालुक्यातील पावसाच्या आगमनापासून तर आजपर्यंत पावसाने थैमान घातला आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तिबार पेरणी करूनही हाती अपयश आले आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके काही प्रमाणात वाचवल्या गेली होती तीही सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडून सर्वच पिके हि पाण्याखाली बुडालेली आहेत. त्यामुळे पातूर तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करुन तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी सरसकट पिकविमा द्यावा तसेच शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीस तालुक्यातील सर्वना पात्र ठरवावे. शेतकऱ्यांना आज रोजी शासन मदतीची गरज आहे. या ओल्या दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहुन व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून पातूर तालुक्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करण्या च्या मार्गावर आहेत. शासनाने जर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वच पिकांना मदत जाहीर केली तर या मदतीचा खुप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल व रोजच्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल. तरी आपण सदर निवेदनाची दखल घेवून तालुक्यातील सर्वच मंडळातील पिकांना सरसकट पिकविमा व शासकीय मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्याल हि अपेक्षाही वंचितच्या वतीने व्यक्त केली. निवेदन देतेवेळी पातूर तालुका अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, महासचिव मंगेश गोळे, संघटक चंद्रकांत तायडे कोषाध्यक्ष शे. राजीक भाई, प्रसिद्धी प्रमुख दिनेश गवई, महिला महासचिव सादना धाडसे, शहर अध्यक्ष महीला करुणा गवई,उपसभापती अर्चनाताई डाबेराव, चरणसिंगजी चव्हाण, दीपकभाऊ इंगळे, अॅड किरण सरदार, अर्जुन टप्पे, इम्रान खान, राजू बोरकर अनिल राठोड, राजेश महल्ले, राणा डाबेराव, स्वातीताई इंगळे, अर्चना धाडसे, दीपाली पोहरे, शरद सुरवाडे, मनोज महादेव सिरसाट, विशाल खंडारे, ज्ञानेश्वर पातुरे,निलखन वस्ताद, योगेश इंगळे, मिलिंद खंडेराव, घमराज राठोड, अनिकेत इंगळे, अक्षय उपरवट सुमेध हातोले, विनय दाभाडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.