विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पातुर नंदापूर येथील परिसरामध्ये कमी वयामध्ये आपली महान कीर्ती चा ठसा उमटवणारा पातुर नंदापूर येथील प्रख्यात किराणा व्यापारी अमोल भास्करराव आव्हाळे ३३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि, १६ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. अमोल हा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या व्यवसायाची छाप सोडून गेला. मनमिळाऊ स्वभाव, दवाखाना असो, गरीबाचे लग्न असो, धार्मिक काम असो, सामाजिक काम असो, प्रत्येक ठिकाणी आर्थिक मदत करण्यासाठी सदैव तत्पर असायचा कधी या अमोलने जात-पात समाज याचा विचार न करता कोणाला ही गरीब माणसाला फोल नाही फुलाची फकळी दील्याशिवाय परत पाठवला नाही. एवढ्या कमी वयामध्ये एवढी कीरती आणि एवढा व्यवसाय वाढवणारा या परिसरामध्ये सगळ्यात मोठा व्यापारी मानला जातो. परंतु एवढ्या लोकांचे आशीर्वाद असून सुद्धा अमोलला वाचवण्याचे भगवंताला कळालेच नाही. सर्वत्र परिसरामध्ये अमोलच्या मृत्यू ने शोक कळा पसरली होती. अमोल ची अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता घरून निघाली अमोलच्या अंत्ययात्रेमध्ये हजारोच्या संख्येने जनसामुदाय अंत्ययात्रेत सामील झाले होते. पातुर नंदापूर परिसरामध्ये एवढा मोठा जनसमुदाय अंत्ययात्रेमध्ये हा पहिल्यांदाच पाहायला मिळाला अमोल नसून हा अनमोल असल्याचे संपूर्ण परिसरामध्ये त्याच्या मृत्यूने शेककडा पसरलेली आहे. त्याच्यामागे पत्नी, मुलगी, आई ,भाऊ असा आप्त परिवार आहे. गावातील सगळ्या नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.











