जितेंद्र लखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : स्थानिक हिवरखेड येथील वार्ड क्रमांक एक मधील दत्त भारतीय मंदिरा जवळील लेंडी पूल गेल्या अनेक वर्षापासून तुटून पडला आहे. मात्र या संदर्भात अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदने ग्रामपंचायत कार्यालयला दिली. मात्र त्यावर पाहिजे तसे कारवाही झाली नाही. त्यामुळे हा पूल पुढील काही दिवसात झाले नाही तर स्वस्तिक ग्रुप व संत गजानन महाराज मंदिर समिती भव्य आंदोलन छेळणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मागील अनेक वर्षापासून हा लेंडी पूल पडला आहे यामार्गावर सरकारी दवाखाना,वीज वितरण केंद्र, सहदेवराव भोपळे विद्यालय, संत गजानन महाराज मंदिर , सोनवाडी फाटा अशा अनेक महत्वपूर्ण दैनंदिन व्यवहारतील दळणवळणा चा रास्ता गेल्या अनेक वर्षांपासून छोट्याश्या टपरी पुलाच्या सहाय्याने चालू आहे. पूल पडला तेव्हापासून मागील तीन ते चार वर्ष पासून “श्री”चा पालखी सोहळा मार्ग बदलला आहे. तसेच गावाला जोडणारा मुख्य रस्त्यावर असणारा पूल हा लेंडी नालापूल आहे. या वर्षी अनेक निवेदने ग्रामपंचायतला देण्यात आली. मात्र पुलाच्या बांधकामाविषयी आतापर्यंत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. बांधकाम सुरू होत नसल्यामुळे संत गजानन महाराज मंदिर समिती व स्वास्तिक ग्रुप यांनी दिनांक 16/09/2022 ला प्रभारी सरपंच रमेश दुतोंडे यांना ग्रामपंचायत कार्यालय येथे लेखी निवेदन दिले. पूलाचे काम लवकर मार्गी लावावे करिता निवेदन देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनीष भुडके,संजय मानके,धनंजय खारोडे उपस्थित होते.