जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
हिवरखेड : नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात मूळ सौन्दळा येथील असणारी व सध्या अकोल्यात राहणारी मुलगी कु.यज्ञजा गणेश राहणे हिने ७२० पैकी ६११ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे तिला पहिल्या प्रयत्नातच हे यश मिळाले आहे.तिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण विवेकानंद प्रा.इंग्लिश स्कुल येथे झाले असून तिला दहावीत ९७ % गुण मिळाले होते.बारावीमध्ये सुद्धा तिने ९२ % गुण मिळवले होते.तिचे वडील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट येथे भांडारपाल असून ती सौन्दळा येथील अल्प भूधारक शेतकरी सदाशिव राहणे यांची ती नात आहे.अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या यज्ञजाने दररोज नियमित ८ तास अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.याबरोबरच सौन्दळा सारख्या छोट्याश्या गावातून नीट परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली मुलगी बनण्याचा बहुमान सुद्धा तिने मिळवला असून तिने सौन्दळाचे नाव उज्वल केले आहे.ती आपल्या यशाचे श्रेय आई -वडील-शिक्षकवृंद तसेच हिवरखेड येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे महेंद्र कराळे सर,घुंगड सर व अंबिकादेवी विद्यालय सौन्दळा यांना देते.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.