दिनेश शर्मा
शहर प्रतिनिधी बुलढाणा
बुलडाणा : अ.भा.सो.क्ष.कासार मध्यवर्ती मंडळ पश्चिम विदर्भ विभागीय मंडळ व पश्चिम विदर्भ विभागीय मंडळ बुलडाणा जिल्हा सो.क्ष.कासार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १८ सप्टेंबर रोजी मिशन प्रशासनद्वारे बुलडाणा जिल्हयातील विद्यार्थ्यांकरीता महोत्सव २०२२ तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा चिखली रोड भातृमंडळ, बँक ऑफ इंडिया सुंदरखेड शाखा परिसरात होणार असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता अखिल भारतीय सो.क्ष.कासार मध्यवर्ती मंडळ माजलगांवचे अध्यक्ष शरदराव भांडेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम येथील अ.भा.सो.कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष गोविंदराव रंगभाळ हे राहणार असून ध्येय अॅकेडमी अमरावतीचे सुजित कुंभारकर, वाशिमचे जलसंधारण अधिकारी शुभम कोरडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमाला गोविंद अंधारे, अरुणराव वेळापूरे,अनिल नागपूरकर, विलास वानरे, मंगेश विभूते, सौ.रेणूकाताई खुळे, राजेश्वरराव मोहिरे, मनिष चुटके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून संघटनेच्या पश्चिम विदर्भ विभागीय व बुलडाणा जिल्हा शाखेचा पदग्रहण समारंभही पार पडणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील तमाम कासार समाजबांधवांनी या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सो.क्ष.कासार मध्यवर्ती मंडळाचे विदर्भ विभागीय जिल्हा शाखा बुलडाणा व डॉ.अरुण पोफळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.