अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला संलग्नीत कृषी महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड २०२२-२३ या कार्यक्रमांतर्गंत रिसोड येथिल मनोज जाधव यांच्या योगायोग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी / सृष्टी डेअरी कृषी उद्योग ला भेट दिली व तेथील कार्य प्रणाली महित केली, तसेच डेअरी मधे दररोज 1500 लीटर दुध येत त्यापासुन वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले जातात. उदा. पनीर, पेढा, दही, लस्सी व ईतर तसेच विद्यार्थ्यांनी सर्व मशिनरी कार्य कश्या करतात हे जाणून घेतले यावेळी विद्यार्थी सुजित इंगळे , प्रविण इंगळे, ओंकार इंगळे, पंकज सोळंके, अनिकेत पुरी उपस्थित होते. या भेटीसाठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ. आशीष अप्तुरकर, श्री. आर. एस. डवरे , रावे प्रमुख प्रा. डी. डी. मसुडकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. वाय. सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले.


