कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या ९९वी आमसभा संस्थेचे अध्यक्ष हिदायत पटेल यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सततच्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना भरीव मदत द्यावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कास्तकार सभागृहात संस्थेची ९९ वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली.यावेळी उपाध्यक्ष शेषराव पाटील वसू,जेष्ठ संचालक रमेश हिंगणकर ,सुभाष मगर,दिनकरराव गावंडे,श्रीकृष्ण रोठे,अरुण जवंजाळ,अरुण डांगरे,संतोष पुंडकर,अमोल रहाणे,हरीभाऊ मानकर,दशरथ खवले,सुनिल अघडते,देविदास बुले,शिवराम बुंदे,अविनाश गावंडे सहकारी जिनिंगचे अध्यक्ष मनोहरराव गये,शंकरराव चौधरी,प्रभाकरराव मानकर तथा संस्थेचे भागधारक शेतकरी मोठ्या संस्खेने उपस्थित होते. संस्थाध्यक्ष हिदायत पटेल व नानासाहेब हिंगणकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर करुन भागधारकांशी संवाद साधला.तर प्रभाकरराव मानकर,गजानन महल्ले,नंदकिशोर हिंगणकर यांनी सभेत मौलिक सुचना मांडल्यात.संस्थेचे व्यवस्थापक डिंगाबर हिंगणकर यांनी अहवाल वर्षातील आर्थिक लेखे,ताळेबंद,नफातोटा पत्रके सभेत सादर केला.त्यास सर्वानुमते मंजूर देण्यात आले. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत.
संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा होणार
तालुका खरेदी विक्री संस्थेच्या स्थापनेला १७मार्च २०२४ला शतक पुर्ण होत असून संस्थेचा शताब्दी महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा अशी सुचना नंदकिशोर हिंगणकर यांनी मांडली तर ओला दुष्काळाचा ठराव गजानन महल्ले यांनी मांडला असता हा ठरावा संस्थाध्यक्ष हिदायत पटेल यांनी संमती देत ठराव मंजूर करण्यात आला.