कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील मुंडगाव येथील शेतकरी मंगेश देविदास झापर्डे यांच्या बैलाचा लंम्पि आजारामुळे नुकताच मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोज घडली या घटनेमुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लंम्पि रोगामुळे बैलाचा मृत्यू झाल्याने मंगेश झापर्डे या शेतकऱ्याचे ६० ते ६५ हजार रुपयाचे नुकसान झाले असून सदर शेतकरी हा हवालदील झाला आहे. आधीच शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाळ्यामुळे पीक उत्पादनात घट आदीमुळे मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातच आता आलेल्या जनावरांवर आलेल्या लंम्पी व्हायरसमुळे जनावरे दगावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत यामुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंडगाव परिसरातील जनावरांना लंम्पि रोगाची लागण झाली असून. बहुतांश जनावरांना औषध उपचार केला गेला आहे. काही जनावरे थोड्या प्रमाणात सुधारली तर काही जनावरे या रोगामुळे गलथान झाले आहेत अचानक आलेल्या लंम्पि रोगामुळे शेतकरी गोंधळात असून आपली जनावर वाचवण्यासाठी धावपळ करीत आहेत. लंपीची लागण होताच बैलावर पाच ते सहा दिवस औषध उपचार करण्यात आले. परंतु काही सुधारणा होत नव्हती आणि अखेर बैलाचा मृत्यू झाला. शासनाने त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी मंगेश झापर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
प्रतिक्रिया
सात ते आठ दिवसांपासून बैल आजारी होता.यावर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांनी उपचार केले, परंतु गुरूवारी सकाळी अचानक बैलाचा मृत्यू झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.या बैलावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होतो.त्यामुळे शासनाने लक्ष देऊन आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.- मंगेश देविदास झापर्डे, शेतकरी