साईनाथ दुर्गम
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
जाफराबाद : गावातील ग्रामसभा ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील ‘लोकसभा’ असते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे, गावाच्या विकासाच्यादृष्टीने ग्रामपंचायतीला सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ आहे .
जाफ्राबाद ग्रामपंचायत येथे मार्च – एप्रिल 2020 पासून कोविड प्रादुर्भाव असल्यामुळे नियमित ग्रामसभा आयोजित केलेले नाही व चालू वित्तीय वर्षाची विकासात्मक कार्याची माहिती सदर सभेद्वारे उपस्थित करावी लोकांना सविस्तर माहिती द्यावी करिता जाफ्राबाद ग्रामपंचायत येथे ग्रामसभा आयोजित करावी. कोविड प्रादुर्भाव असल्यामुळे आतापर्यंत ग्रामसभा आयोजित केलेला नाही आणि कोणत्याही गावातील विकास कामे झाले नसल्याने जाफ्राबाद ग्रामपंचायत द्वारे गावातील नागरिकांना सल्ला व मार्गदर्शन मिळत नसल्याने त्वरित ग्रामसभा आयोजित करुन माहीती द्यावी असे जाफ्राबाद ग्रापं गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा यांच्याकडे व प्रतीलीपी मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली निवेदनाद्वारे मागणी केली आहे.