शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्र.५ चे मुख्याध्यापक व आठ शिक्षकाच्या गुणगौरव शैक्षणिक साहित्य व उपक्रम सह गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालिकाचे लौकिक वाढविन्याचे कार्य या शाळेने केलेले आहे. या शाळेला अकोलाचे जिल्हाधिकारीना दोन वेळ भेट दिली व महाराष्ट्रातून तब्बल एक हजार पेक्षा जास्त शाळांना भेट दिलेली आहे. दरवर्षी या शाळेची पटसंख्या मध्ये वाढ होत चालेली आहे. भरपूर साहित्य व ज्ञानरचनावादी पद्धतीने या शाळांमध्ये अध्यापन केला जात आहे. या शाळेतील मुख्याध्यापक व शाळांचे शिक्षकांचे कार्याचे दखल घेऊन ५ सप्टेंबर शिक्षण दिन रोजी अकोट नगरपरिषद येथे माननीय डॉक्टर मेघना वासनकार मुख्याधिकारी अकोट व श्री, सुनील तरोडे प्रशासन अधिकारी यांचे शुभ हस्ते नगरपरिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक ५अकोट चे मुख्याध्यापक सै.जहीरोद्दीन सै. गयासोद्दीन यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मोहम्मद नज्मुल हुदा मोहम्मद शहाबुद्दीन,असलम खान मुर्तुज़ा खान,फरहान अंजुम अश्फाक अली,अब्दुल खालिद अब्दुल सादिक,कलिमोद्दीन रफीयोद्दीन, मोहम्मद मुजीबुर रहमान अब्दुल जलील,मोहम्मद शाकीर अब्दुल राजिक,मोहम्मद अजीम मोहम्मद इद्रिस,या शिक्षकांना आर्दश शिक्षकपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.











