श्री.चंद्रकांत तिवारीजीने केले आपल्या भजनातून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध ; गणपती गणेश उत्सव परिवाराचे आयोजन
कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : स्थानिक जवाहर रोड येथील गणपती गणेश उत्सव परिवार यांच्या वतीने अकोट येथीलच प्रसिद्ध चंद्रकांत तिवारीजी यांचे बहारदार भजन गायनाचा कार्यक्रम भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तिवारीजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाहून एक सुरेल गीत सादर करत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कोरोंना महामारीमुळे मागील दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षीचा गणेश उत्सव कोरोना निर्बंध मुक्त साजरा होत असल्यामुळे गणपती मंडळ व भक्तांमध्ये अभूतपूर्व आनंद दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती आज ताणतणावामध्ये जीवन जगत आहे. संगीत हे एकच साधन आहे जे आपल्या सर्वांना तान तणावा पासून मुक्त करते. सर्वांना आनंद मिळावा, मनोरंजन व्हावे या हेतूने भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला तिवारीजी,धीरज अढाऊ,अमोल टावरी,भूमीत गुप्ता,भूषण गणगणे वैभव पाठक,श्याम तायडे यांनी गणेश वंदना गाउन कार्यक्रमाची सुरुवात केली.नंतर आपल्या सुंदर आवाजात भजन भक्तीगीत, भावगीत प्रस्तुत केले. वेगवेगळ्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये नवीन चांडक,सचिन राठी,किशोर लखोटीया व तसेच यामध्ये गणेश मंडळाचे सर्वश्री सदस्य सत्यनारायण टावरी,जुगल झुणझुणवाला,विजय सेदानी,सुरेश टावरी,संतोष टावरी,यश्विन सेजपाल,हितेश सेदानी,लाला सेदानी,रितेश सेदानी,कु.चंचल पितांबरवाले,अमोल टावरी,अंकित झुणझुणवाला,अलका टावरी,डॉ. रुचिता झुनझुनवाला,मधुर टावरी, तथा बहुसंख्य महिला मंडळी व नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश भालतीलक,अंबादास काठोके,राहुल मानकर,महेश भालतीलक,नवणीत काळे,नंदू टेमझरे,जितेश रामनानी,गणेश काठोके,अनंता