ज्ञानेश्वर कापसे
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : सदनिकांच्या किमतीप्रमाणे मिळकतकराची आकारणी करण्यात येणार असून , आलिशान सदनिकाधारकांना कराचा अधिक भार सोसावा लागणार आहे . पहिल्या टप्प्यात 15 पैकी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील साधारण 80 हजार मिळकतींना सुधारित मिळकतकर ( कॅपिटल टॅक्स ) आकारला जाणार आहे . महापालिकेकडून शहरात वाजवी भाडयाच्या दराने कर आकारणी केली जाते .. त्यानुसार , जुन्या मिळकतींना कमी तर नवीन मिळकतींना जादा कर आहे . तर अनेक व्यासायिक मिळकतींच्या करातही फरक आहे . त्यामुळे शहरासाठी एकसमान कर आकारणी असावी , या उद्देशाने महापालिकेकडून भांडवली मुल्यावर आधारीत कर प्रणालीचा अभ्यास केला जात आहे . त्यासाठी पालिकेने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीकल ऍड इकॉनॉमिक्स या संस्थेचे नेमणूक केली आहे .
या संस्थेने आपला अहवाल नुकताच महापालिकेस सादर केला आहे . जी याबाबत बोलताना महापालिका आयुक्त कुमार म्हणाले , सुरुवातीला 100 मिळकतींचा अभ्यास करण्यात आला , त्यात , महापालिकेकडे असलेल्या संबंधित मिळकतीच्या माहितीनुसार , कर आकारणी करण्यात आली , तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून कर आकारणी करण्यात आली , त्यात , जवळपास दुप्पट फरक आढळून आला , त्यामुळे याचा सविस्तर अभ्यास होणे गरजेचे आहे . त्यामुळे आता हा अभ्यास विस्तारीत स्वरूपात केला जाणार असून त्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयातील कोणत्याही एका क्षेत्रीय कार्यालयाची निवड केली जाणार आहे . त्यातील सुमारे 80 हजार मिळकतींचा अभ्यास केला जाणार आहे . त्यात , निवासी , व्यावसायिक , लहान सोसायट्या , मोठ्या सोसायट्या , बैठी घरे अशा सर्व प्रकारच्या मिळकतींचा समावेश असणार आहे . या अभ्यासातून पुढे माहितीच्या आधारावर ही कर प्रणाली लागू केली जाणार आहे .
महापालिकेने दिलेल्या मिळकतकरामधील 40 टक्के सवलतींसदर्भात विविध संघटना , स्वयंसेवी संस्थांनी निवेदने दिली आहेत . यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक झाली आहे . त्यांनी राज्य शासनाबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे . त्यामुळे याबाबत राज्य शासनाबरोबर बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे
विक्रम कुमार , आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी सांगितले.