कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ग्राम पोपटखेड येथील वीर एकलव्य आपात्कालीन बचाव पथक च्या विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा मध्ये गावातील वीर एकलव्य गणेशोत्सव मंडळ व न्यू सत्यम गणेशोत्सव मंडळ या दोन्ही मंडळातील 70 युवकांनी सहभाग घेवुन रक्तदान केले.शिबिराला ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.नितीन सर देशमुख यांनी भेट दिली,जिल्ह्यात सध्या रक्ताची चणचण जाणवत आहे. कोरोना च्या महासंकटामुळे व अनेकांनी लस घेतल्याने किंवा मागील एक दोन महिन्यापूर्वी रक्तदान केल्यामुळे नेहमीच्या रक्तदात्यांना रक्तदान करता येत नाहीये अशातच असे शिबिर झाल्यास रक्त पेढ्याना दिलासा मिळतो त्यामुळे जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.नितीन देशमुख साहेब यांनी केले.शिबिरात रक्त संकलना साठी अकोला येथील ठाकरे रक्त पेढी ने सहकार्य केले यावेळी वीर एकलव्य आ.बचाव पथक चे अध्यक्ष पांडुरंग तायडे वीर एकलव्य गणोशोत्सव मंडळ चे अध्यक्ष सतीश मोरे व न्यू सत्यम गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष मनिष तायडे व प्रदीप राठोड वनरक्षक, सिद्धार्थ बन्सोड मा.सरपंच हे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आकाश तायडे, अज्जू सुरत्ने, सतीश ठाकूर,मोहित भाष्कर,अर्जुन मोरे,गोपी तायडे,सागर कठोते,मयूर जयस्वाल, कुलदीप सुरत्ने,दीपक ठाकरे व मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.