अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : दि ४ सप्टेंबर २०२२ सार्थक वक्तृत्व अकॅडमी व सम्यक संबोधी संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुली भव्य वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापुरच्या संकेत पाटील याने प्रथम पारितोषिक पटकावून ‘प्रोफेसर डॉ. एम. आर.इंगळे वक्तृत्व करंडक 2022’ हा बहुमान प्राप्त केला.फुले, शाहु, आंबेडकरी विचारवंत व सुप्रसिध्द वक्ते मा. प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त दि.04 सप्टेंबर 2022 रोजी सम्यक संबोधी सभागृह,रणपिसे नगर,अकोला येथे राज्यस्तरीय खुली भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.देशातील सद्याची परिस्थिती पाहता संवेदनशील समाज निर्माण होण्यासाठी विचारशील आणि कृतीशील पिढी तयार व्हावी या प्रामाणिक हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाराष्ट्रातील काणा-कोपऱ्यातुन तरुणांनी सहभाग नोंदविला होता. त्याकरिता बक्षिसे म्हणून प्रथम 7000/-,द्वितीय 5000/-,तृतीय 3000/-, प्रोत्साहनपर पाच पारितोषिक प्रत्येकी 1000/- रोख,ट्रॉफी, प्रमाणपत्र व संविधान असे बक्षिसाचे स्वरूप होते. एकून २०,०००₹ ची बक्षीसे होती.या स्पर्धेत प्रथम संकेत पाटील (कोल्हापूर),द्वितीय यश पाटील (मुंबई),तृतीय अक्षय इळके (इचलकरंजी) प्रोत्साहन
१) मंदार लटपटे ( परभणी)
२) सारांश सोनार (कोल्हापूर)
३) वैष्णवी अतकरे (नागपूर)
४) पवनलाल हुकरे ( भंडारा)
५) विशाल खर्चवाल ( नागपूर) यांनी पारितोषिके पटकाविली. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणुन डॉ. राजेश देशमुख,संजय कमल अशोक,चंद्रकांत झटाले यांनी जबाबदारी पार पाडली.बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला हे होते.तर विचारमंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. संदीप भोवते, प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे, सौ. संगीता इंगळे, डॉ. बि. एस. इंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. एम. आर. इंगळे यांनी ही स्पर्धा निरंतर सुरू राहील आणि महाराष्ट्रात मानाचे स्थान प्राप्त करेल असे सांगुन स्पर्धेला वाढता प्रतिसाद बघतां अजुन स्पर्धेला सर्वदूर पर्यंत पोहचविण्याचे काम करु असे प्रतिपादन केले.देशातील समस्यांवर चिंतन करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण एकत्रित आले हेचं तरुण जागृत आहेत याचे लक्षण आहे. विचारांचा जागर घालणारी ही स्पर्धा आहे. डॉ.एम.आर. इंगळे यांचा वाढदिवस वैचारिक पध्दतीने साजरा होतो याचा सार्थ अभिमान वाटतो.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय खडसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी हागोणे तर आभार प्रदर्शन विशाल नंदागवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॅा मनोहर वासनिक, प्रा.राहुल माहुरे,प्रा.आकाश हराळ,विशाल इंगळे,अमित लोंढे,आदीत्य बावनगडे,नागसेन अंभोरे, अभय तायडे, भरत चांदवडकर,,सागर तायडे,रोहन काळे, अमित वाहूरवाघ, शशिकांत इंगळे,नागेश वाहुरवाघ सागर वारके, यश तिवारी, चेतन डोंगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.











