हिरा आसलकर
तालुका प्रतिनिधी मलकापूर
मलकापूर : राजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळ व जागर मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने नळगंगा नगर मलकापूर ग्रामीण येथे बीपी व डायबेटिस कॅम्प आज आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिक व 65 वर्षावरील नागरिकाचे मोफत बीपी व शुगर तपासण्यात आली या वेळी मलकापूर ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या जनजागृती मोहीमेत एकूण 96 नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली या वेळी जागर मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. नितीन बऱ्हाटे, विजय राणे, सुधीर पाटील, नाना नारखेडे, घनश्याम वराडे व मंडळाच्या वतीने सूर्यकांत उंबरकार,कुणाल नारखेडे, शरद ठोसर, विक्रम राणे, विनय पाटील, रोहन नारखेडे, संकेत खराटे, योगेश माळी, रोशन ठाकूर, गणेश वराडे, नितीकेश खोडके आदी राजमाता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.