अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
वाहाळा : बु येथे किरकोळ कारणावरुण शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला दोघा भावांनी बेदम मारहाण केल्याची घटना 1 सप्टेंबर रोजी घडली आहे या मारहाणीमध्ये शिवसेना शाखाप्रमुख रामहरी पल्हाड हे जखमी झाले आहेत. टोपले नेल्याच्या कारणावरुण ऐका गटातील एका व्यक्तीला असली शिवीगाळ करुण मारहाण करण्यात आली आहे. व शिवसेना शाखा प्रमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एका गटाच्या रामहरी पल्हाड यांच्या फिर्यादीवरून शुभम भोकरे व आकाश भोकरे या भावाविरुद्ध चान्नी पोलिसानी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.