सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी, मूर्तिजापूर
मुर्तिजापूर : गोरबरीब,दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरणाची योजना राबवली जात आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना तांदूळ,गहू,साखर आदी रेशन वितरण करण्यात येते. सदर रेशनचे गोरगरिबांच्या आयुष्यात महत्त्व आहे. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील गव्हाचा पुरवठा रेशन दुकानातदारांना झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरिष्ठ स्तरावरूनच गव्हाचा पुरवठा करण्यात न आल्याने सदर परिस्थिती ओढावली आहे.ऐन सणासुधीच्या काळात गहू मिळणे बंद झाल्याने गोरगरिब शेतकरी कार्ड धारकांना कार्डवर गहू मिळणे बंद झाले आहे. शासन स्तरावरून गव्हाचा अनियमित पुरवठा होत असल्याने जून महिन्यातील गहू लाभार्थ्यांना उशिरा वाटप करण्यात आला. मात्र जुलै ऑगस्ट महिन्याचा गहू योग्य प्रमाणात वाटप करण्यात आला नाही. पोळा सण नुकताच आटोपला आता गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.सर्वत्र धार्मिक सणासुदीत लाभार्थ्यांना गहू मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र संपला व्यक्त केला जात आहे.याकडे जिल्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनीही लक्ष देत नसल्याने सण उत्सव गेल्यानंतर गहू वाटप करणार का असा संतप्त सवाल लाभार्थी उपस्थित करीत आहे.
खाजगी दुकानातून गहू खरेदी
दैनंदिन जेवणात प्रत्येक घरी होळीचा उपयोग केला जात असल्याने नागरिकांना पोळीची सवय जडली आहे.मात्र,जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात या महिन्याचे गहू वितरण करण्यात आलेले नाही.परिणामी शेतकरी कार्ड धारकांना गहू मिळणे बंद झाले आहेत.नाईलाजास्तव लाभार्थ्यांना खाजगी दुकानात अधिकची रक्कम मोजून गहू खरेदी करावे लागत आहेत.दुकानात 28 रुपयांपासून तर 40 रुपये प्रति गहू विक्रीस उपलब्ध आहेत.परिणामी गोरगरिबांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
लाभार्थ्यांवर नवे संकट
मागील काही वर्षापासून सातत्याने महागाई वाढली आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह गरीबांचे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. वर्तमानकाळात जीवनावश्यक वस्तूंसह विविध साहित्यांच्या किमतीत वाढ झाली असल्याने नागरिकांना आर्थिक संकटांना तोड द्यावे लागत आहे.या महागाईच्या काळात गोरगरीबांसाठी स्वस्त धान्य दुकानातून प्राप्त होणाऱ्या रेशनचा मोठा आधार होत आला आहे.मात्र,स्वस्त धान्य दुकानातून प्राप्त होणारे गहू बंद करण्यात आल्याने गोरगरिबांवर नवे संकट कोसळले आहे.