साईनाथ दुर्गम
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : जिल्हा सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येतील मेडिगड्डा धरणाचे पीडित शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादन करा आणि नुकसान भरपाईची मागणी घेऊन अनेकानेक निवेदन शासनाला दिली होते. आणि गेल्या 23 अगस्ट पासून 26 अगस्ट पर्यत या तारखेला तहसील कार्यालय समोर चार दिवसांचे साखळी उपोषणही ही करण्यात आले होते.साखळी उपोषणाला अहेरी उप विभागीय अधिकारी अंकित यांनी सिरोंचा तालुका दौऱ्यावर येऊन मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांना सप्टेंबर 2 तारखेला जण सुनावणी साठी बोलाविण्यात येईल.असे आदेश दिले. त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागे घेतले.व त्याच प्रमाणे आज 2 सप्टेंबर रोजी सिरोंचा तहसील कार्यलायात मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांची भूसंपादन प्रकियेच्या विषयावर मद्दीकुंठा , जानमपल्ली, आरडा, मुदुकृष्णापुर, मुगापूर, यागावातील प्रत्येकाना कार्यलायात बोलवून शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे, शेतकऱ्यांची जमिनीचे सर्व कागदपत्रे तपासणी करण्यात आली आहे.लवकरच मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वे करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करू व असे उप विभागीय अधिकारी अंकित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आली आहे, व नंतर पिडीत शेतकरयानी मेडिगट्टा संबभधित अदिकार्याना सुधा विचारणा केले असता त्यानी म्हटलेकी येत्या 3 आक्टोबर रोजी तहसिल कार्यालय सिरोंचा येथे बैठक घेण्यात येईल असे सांगण्यात आले.पिडीत शेतकरी अधिकार्याना मान देऊन म्हटले की जर येत्या 3 अक्टोबर ला शेतकरयाचे मार्ग मोकडे केले नाही तर आम्ही मोठ्या संखेने रोडवर उतरु असे पिडीत शेतकरयानी अधिकर्याना म्हटले आहे व मिडिया समोरही म्हटले आहे.त्यावेळी सिरोंचा चे तहसीलदार जितेंद्र सिकतोडे, यांच्या सह मेडिगड्डा धरणाचे अधिकाऱ्यांनी उपस्थित होते.