कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : तालुक्यातील ग्राम पणज येथील महालक्ष्मी माता मंदीरात दरवर्षी प्रमाने याही वर्षी ज्येष्ठ गौरी आव्हान निमित्त सतत तीन दिवस मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2022 ला यात्रा महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी पणज यांच्या तर्फे करण्यात आले आहे, पणज ग्रामस्थांचे ग्राम दैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदीराची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओळख आहे.
मागील दोन वर्षे कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने यात्रा महोत्सव हा कार्यक्रम शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला होता. या वर्षी सर्व सुरळीत चालू असल्याने यात्रा महोत्सव साजरा होत आहे. सात पुडा पर्वताच्या पायथ्याशी तसेच बोर्डी नदीच्या काठावर असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदीरात दरवर्षी प्रमाने याही वर्षी भजन पुजन दर्शन महाप्रसाद तथा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे यात्रा आयोजन समिती व समस्त गावकरी मंडळी पणज यांनी कळविले आहे.











