कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, अकोट
अकोट : शहरात काही भागांमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असल्याने मोठ्या प्रमाणात मच्छरांचा डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामतः मलेरिया डेंगू चिकनगुनिया सदृश्य आजारांनी नागरिकांना घेतले आहे.काल अकोटमध्ये वार्ड क्र. ५ मध्ये डेंग्यूची ७ जणांना लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याबाबत सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अकोट येथील वार्ड क्र. ५ धोबी पुरा अकोट या परिसरात अती घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसते. नगरपालिका फक्त कर वसुली साठीच आहे का ?आरोग्य विभाग याकडे का दुर्लक्ष करीत आहे असे प्रश्न या मोहल्यातील नागरिक विचारत आहे. न.पा.ने वार्ड क्र. ५ मध्ये साफसफाई व फवारणी लवकरात लवकर करण्यात यावी. या परिसरातील जवळपास सात ते आठ बाल रुग्णांना खाजगी रुग्णालयात भरती केल्याचे वृत्त आहे.