अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
गणेश उत्सव निमित्त पातुर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता समितीची सभा आज संपन्न झाली आहे.या सभेमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी गणेश मूर्ती स्थापनेबाबत तसेच गणेश मंडळाकरिता असलेल्या मार्गदर्शक सूचना सांगून त्यांनी हा गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शशिकांत मेन, पत्रकार देवानंद गहिले, सचिन वारोकार यांनी प्रशासनाकडे सूचना मांडल्या या सूचनांचा पाठपुरावा करण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पातूरच्या ठाणेदार विजय नाफडे यांना सांगितले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक हर्षु रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक मीरा सोनोणे, पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, पत्रकार बांधव,महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते पोलीस कर्मचारी या सभेला उपस्थित होते.