चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : सध्या सोशल सोशल नेटवर्किंग साईट किंवा नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे , खंडणी मागणे बदनामीकारक फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करणे , सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून वरील सर्व प्रकारचे गुन्हे रोजच घडत आहेत . स्मार्ट फोनचा वापर अधिक प्रमाणात वाढलेला आहे.
परंतु अॅप्लिकेशन वापरताना काही महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष वेधून आपण सतर्क राहून फसवणूक टाळू शकतो . जसे ,अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिकेस्ट स्वीकारू नये ,बनावट कर्ज पुरवठा योजना च्या अमिषाला बळी पडून आपली वैयक्तिक माहीती भरणे टाळावे , कोरोना लस संबंधित बनावट फोन कॉल , फ्री रिचार्ज , कॅशबॅक , केंद्र सरकारच्या नावाने बनावट कर्ज योजना बनावट सौर विद्युत पंप योजना ,तसेच ओटीपी फ्रॉड ,क्रेडिट कार्ड फ्रॉड पासून सुद्धा सावध राहणे आवश्यक आहे . सरकारी योजना करीता शासकीय अधिकृत वेबसाईट वर आधी संपूर्ण माहिती घेऊन अर्ज सादर करावेत . सोशल मीडिया वर अनोळखी लोकांना फॉलो करू नये , तसेच सोशल मीडिया साईट वर आपली वैयक्तिक माहिती शक्यतो संपूर्ण भरू नये , फिल्टर चा पर्याय वापरावा , फोटो ला लॉक करणे ,लॉग इन आणि लॉग आऊट चा पर्याय नेहमीच वापरणे योग्य असते ,काही लोक नेहमीच डेटा ऑन ठेवतात ,व सोशल मीडिया साईट वर लॉग इन मोड मध्ये असतात . असे अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण जास्त असते ,परिणामी मोबाईल मधील माहिती चोरीस जाते , हॅकर्सला आपली माहिती सहज उपलब्ध होते.गरजे नुसार डेटा ( इंटरनेट ) ऑन ऑफ करणे चांगले असते. त्यामुळे काही प्लिकेशन हे मोबाईल मध्ये डेटा वापरत असतात , व असे अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण जास्त आहे . सोशल मीडिया चा काळजीपूर्वक वापर करून आपण सायबर हल्ले , सायबर गुन्हे , तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्यापासून बचाव करू शकतो ,असे आवाहन
विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी केले आहे .











