आई वडिलांचा एकच टाहो
घटनेमुळे सर्वांचे मन झाली सुन्न बघ्याची गर्दी
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील मनब्दा गावातील वर्ग 7 वी शिकणारे मुले ऋषीं संतोष सुरळकार, सागर संतोष दांडगे वय अंदाजे १४ वर्षे मनब्दा येथील विद्रुपा नदीतील खोलीकरण केलेल्या तलावात बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी बातमी आली खर तर सम्पूर्ण मनब्दा गाव व तेल्हारा तालुक्यात या बातमी मुळे अत्यंत सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे या दोन्ही मुलाचे आई वडील हे शेतमजुरी करण्यासाठी शेतात गेले होते त्यामुळे मुलावर कुणीही लक्ष द्यायला नव्हते मुलांनी गावा बाहेर असलेल्या नदी जाऊन आंघोळ करू असा अंदाज व्यक्त केला मात्र नदीत केलेल्या खोलीकरण मुळे नदीला तलावाचे रूप आले आहे त्यामुळे मुलाना पाणी पातळी खोल असल्याचा अंदाज आला नसावा त्यामुळे एकमेकांचा तोल जाऊन दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे सदर घटनेची माहिती मनब्दा गावातील माजी सरपंच गोपाल राऊत,प्रदीप पाथ्रीकर पोलीस पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तातडीने तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड याना माहीती दिली आहे त्यावर तातडीने तेल्हारा ठाणेदार पुढील कार्यवाही साठी आपल्या पोलीस ताफासह घटनास्थळी पोचले समस्त मनंब्दा गावात शोककळा पसरली आहे.


