अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शिक्षकांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना शाळेबाहेर नेऊन जगात काय चालले आहे दाखवण्यासाठी व शाळा विद्यार्थी यांच्यामधील तोच तो पणा घालवण्यासाठी शिक्षकांना अभ्यास भेटीला गटाने गेल्यामुळे संघ भावना वाढीस लागावी व पर्यायाने विद्यार्थी घडवण्यासाठी आवश्यक व्यक्तिमत्व त्यांचे घडावे यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी तब्बल 60 विज्ञान व गणित शिक्षकांचा पाच दिवशीय अभ्यास दौरा गुजरात मध्ये नेऊन यशस्वी केला. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी सुरुवातीपासूनच शिक्षकांना अभ्यास दौऱ्याची सवय लावली. आजवर अनेक विज्ञान केंद्र पर्यटन केंद्र,ऐतिहासिक स्थळे त्याचबरोबर पर्यावरण अशा अनेक ठिकाणी त्यांनी शिक्षकांसह भेटी दिल्या. या अभ्यास दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या शिक्षकांसह गुजरात सायन्स सिटी ला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. त्यासाठी गुजरात सायन्स सिटी चे प्रमुख नरोत्तम साहू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर्स एज्युकेशन (IITE) ला भेट देऊन कुलपती हर्षद पटेल यांची भेट घेतली व शिक्षक व विज्ञान यांच्यामधील सहसंबंध या बद्दल चर्चा केली. तर अब्दुल कलाम हस्ते पुरस्कार प्राप्त कलरव स्कूल हलोल येथील शाळेला भेट देऊन प्राचार्य कल्पनाबेन जोशीपुरा यांच्या सोबत विज्ञान व तंत्रज्ञान याचा विद्यार्थी जीवनावर होणारा परिणाम याविषयी चर्चा केली. या सोबतच इस्रोचे सिनियर सायंटिस्ट श्री नरेंद्र भट यांच्या सोबत चर्चा करून उपग्रहा विषयी माहिती घेतली.या अभ्यास दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 60 शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायन्स इंडियाचे चेअरमन डॉ.चंद्रमौली जोशी यांचे मोलाची मार्गदर्शन लाभले. अभ्यास दौरा यशस्वी व्हावा यासाठी उपशिक्षणाधिकारी अरविंद जाधव व विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र भास्कर यांनी आयोजन व नियोजन केले. हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी सुनील वावगे, प्राचार्य माधव मुंशी, देवानंद मुसळे, शशिकांत बांगर, मनीष निखाडे, पी .पी चव्हाण, विश्वास जडाव, विजय पजई,चक्रे सर, धम्मदीप इंगळे, मनोहर कापडे,जाधव सर यांचे सहकार्य लाभले.
शिक्षकांनी शाळेबाहेर निघून जगात काय चालले आहे याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे असून अध्यापनातला तोच तो पणा घालून विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनातून काय नवीन देता येईल यासाठी अभ्यास केंद्रांना भेटी देणे आवश्यक आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर
प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते या प्रकारे अभ्यास दौरे आयोजित केले तर शिक्षकांची त्यांच्या विषयाची प्रगल्भता वाढून शिक्षक विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व घडवू शकते.
प्रा. डॉ. रवींद्र भास्कर
जिल्हाध्यक्ष विज्ञान अध्यापक मंडळ
विद्यार्थ्यांची पिढी घडविली नाही तर ध्येयवादी शिक्षण व्यवस्थेची विकलांग अवस्था होऊ शकते असे होऊ नये यासाठी शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिल्यास विद्यार्थी देशाचे भविष्य घडवू शकतात.
सुनील वावगे
अध्यक्ष पातुर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ