गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बैल पोळा आनंदि वातावरणात सुरू आहे शिवाजी चौक सर्वात मोठा पोळा भरला जातो ज्यात 5 प्रकारच्या गुळ्या,5 प्रकारचे बैल घेऊन दरवर्षी प्रमाणे विठ्ठल खारोडे,संजय देशमुख, हरिभाऊ लासुरकार, शिवा येते,अंबादास मामनकार हे शिवाजी चौकातील पोळ्या भरल्या ठिकाणी घेऊन येतात बैल विधीवध पूजा अर्चा केल्यावर बैल पोळा फुटतो तो फुटल्या जे बैल धारक शेतकरी समोर असतील ते पोळ्या ठिकाणी असलेल्या तोरणावर लावलेल्या नारळा पताका बैल घेऊन धावत काडी ने फोडतात त्यामुळे यावेळी एकच टाळ्या फटाके आतिषबाजी वाजवून जल्लोष पाहायला मिळतो तर दुसरीकडे माळेगाव नाका,सोनार गल्ली,सात्काबाद आदी भागात सुद्धा बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला यात सर्व शेतकरी आपले बैल ही विविध देखावे सजवून त्यांना बैल पोळ्या ठिकाणी घेऊन आले व तेथे पूजा अर्चा घेऊन पोळा फोडल्या गेला त्यामुळे शहरातील हे सर्व छोटे मोठे पोळे पाहण्यासाठी मोठया प्रमाणात विद्यार्थी ,मुले नागरिक यांची गर्दी तर दुसरीकडे काही हौशी बैलासोबत सेल्फी घेऊन व्हाट्सएप वर टेट्स तर फेसबुक इंस्टाग्रामवर आपल्या बैलासोबत फोटो अपलोड करून आनंद व्यक्त करताना दिसले एकंदरीतच देशाचा शेतकरी हा कृषी राजा आहे त्यांचा खरा शेती मित्र हा बैल च आहे त्यामुळे हा आनंद वर्षातील एकदाच येत असल्याने तो पूर्ण आनंदी वातावरणात शेतकरी साजरा करताना दिसले.
शिवाजी मंडळाचा उत्कृष्ट बैल सजावट बक्षीस उपक्रम !
तेल्हारा शिवाजी मंडळाच्या वतीने प्रथमच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या बैलपोळ्या बैलजोडी सजावट स्पर्धा 2022 घेण्यात आली यात शरीर बांधा, शिंग शिंगोटी,उंची पूर्ण आदी साठी 3,000 रु ,2,000 रु तर 1,000 रु असे रोख बक्षीस ठेवण्यात आले यात सर्व जमलेल्या शेतकऱ्यांच्या बैलाची प्रत्यक्ष पाहणी शिवाजी मंडळाच्या निवड समिती यांनी केली व अंतिम रित्या निवड जाहीर केली यात प्रथम क्रमांक शेतकरी मंगेश कारंडे, दुत्तीय हरिभाऊ तायडे,तृतीय वसंतराव घगाळ,चतुर्थ बाळू ठाकरे यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले यावेळी सर्व शिवाजी मंडळाचे सर्व जेष्ठ मंडळी निवड केलेल्या यांनी अचूक आपली भूमिका बजावली.
तेल्हारा बैल पोळ्यात रंगली देशभक्ती ! तेल्हारा शहरातील जेष्ठ कवी शिवराज जामोदे यांच्या बैलांना त्यांनी तिरंगा कलर लावून मधोमध अशोक चक्र देऊन भारतीय स्वातंत्र्य उत्साह बैल पोळ्यात साजरा केला यावेळी बैलांना घेऊन पोळ्यात त्याची पुतणे विश्वजित माधव जामोदे,प्रज्वल रवींद्र जामोदे यांनी उपस्थित लावली होती यावेळी नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.