मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमी मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्कूलमध्ये दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला. चिमुकल्यांनी मटकी सजावट ,डान्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांनी वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी नर्सरी ते केजी टू पर्यंत चिमुकल्या मध्ये कृष्ण व यशोदा मैया यांच्या वेशभूषा ची स्पर्धा घेण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. प्रीती तिडके मॅडम प्राचार्य .चंद्रकांत तिवारी सर, उपप्राचार्य निमिता गांधी मॅडम नितीन कोल्हे सर उपस्थित होते. सूत्रसंचालन माया बाजारे व रुपाली ढोले यांनी केले. सेंट पॉल अकॅडमी चे अध्यक्ष नवनीतजी लखोटीया सर, उपाध्यक्ष्य लूनकरणजी डागा सर सचिव. प्रमोद चांडक सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन हाऊस ची शिक्षिका संगीता मानके ,नागापुरे , स्वाती गावंडे , तसेच दहि सर , बावणे सर ,सुलभा एलुकार, चैतन्य खारोडे ,स्वप्निल कातव सर महेश आहेरकर सर व उज्वला गावंडे, विमल येऊल, ऋषाली मॅम, टावरी मॅम, राहणे मॅडम, गोतमारे सर, शिषिका, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


