गंगाधर सुरळकर
तालुका प्रतिनिधी शेगाव
तरोडा कसबा : दरवर्षी प्रमाणे तरोडा कसबा या गावामध्ये कावड यात्रा निघते.रुद्र अवतार बजरंगी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय थाटात कावड काढली .यामध्ये बालगोपाल पासून ते गावातील कार्यकर्ते सहभागी होते श्री क्षेत्र नागझरी ते तरोडा 20 किलोमिटर अंतर खांद्यावर गाठून रुद्र अवतार बजरंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केले. अंगात जिद्द व देवावर विश्वास कोणतीही गोष्ट अशक्य नाही तसेच आनंद परशुराम सुरळकर या चार वर्षीय बालकाने महादेची भूमिका बजावून कार्यक्रमाला खूप शोभा आली.


