जितेंद्र लखोटिया
ग्रामीण प्रतिनिधी,हिवरखेड
हिवरखेड : तमाम राजस्थानी समाजाच्या आराध्य रामदेवबाबा यांच्या जीवन कार्यावर आधारित जम्मा जागरण सोहळ्याचे आयोजन स्थानिक अकोट – हिवरखेड रोड, मरुधर धाम, पी. पी. जिनिंग , आकोट रोड, हिवरखेड येथे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता पासून प्रख्यात जम्मा गायक डॉक्टर देवेंद्रजी राठी,आर्वी आपल्या सुरेल आवाजाने अनोख्या शैलीने भाविकां ना मंत्रमुग्धा करतील कार्यक्रमा ला रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित जन्म सोहळा, व्यावले,परचे सुगनाबाई विलाप आदि प्रसंग गायक कथन करणार आहेत. सदर कार्यक्रमां मध्ये विशेष प्रार्थी म्हणून रामदेव बाबा सेवा समिती आडगाव बु., अकोट , जामोद, जळगाव, तेल्हारा,संग्रामपूर, सोनाळा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपस्थित सर्व भाविकां साठी भोजन प्रसादि ची व्यवस्था रामदेवबाबा सेवा समिती हिवरखेड यांच्या कडून करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त रामदेवबाबा भक्तांनी जम्मा जागरण चे लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.